विद्याभ्यास आणि स्वातंत्र्यलढ्यातील कारावास गणेशपंत ऊर्फ अण्णासाहेब गोरे हे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील देवगड तालुक्यामधील हिंदळे या गावचे राहणारे. मुंबईला मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर त्यांना शिक्षणखात्यात नोकरी लागली आणि ते पुण्याला आले. त्यांना दोन मुले. थोरली गंगू आणि तिच्या पाठचा नारायण. नारायणला घरात नानू म्हणत. नानूचा जन्म १५ जून १९०७ रोजी झाला.