या योजने अंतर्गत ज्यांचे एकही पुस्तक प्रकाशित झाले नाही, अशा नवलेखकांना कथा, कादंबरी, ललितगद्य, काव्य, नाटक (एकांकिका), बालवाङ्मय या लेखनाच्या प्रकाशनासाठी मंडळाकडून अनुदान दिले जाते. आतापर्यंत सदर योजनेअंतर्गत 2197 नवलेखकांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

नवलेखक सदर योजनेच्या माहितीपत्रक व अर्जासाठी येथे क्लिक करा

नवलेखकांची चर्चासत्रे/ कार्यशाळांना अनुदान योजना – नवलेखकांना ज्येष्ठ साहित्यिकांचे मार्गदर्शन व्हावे, त्यांच्या लेखनात सुधारणा व्हावी, म्हणून महाराष्ट्रात विविध ठिकाणी नवलेखकांची दरवर्षी 7 चर्चासत्रे/कार्यशाळा आयोजित केल्या जातात. मंडळाकडून महाराष्ट्रभर आजमितीपर्यंत 106 चर्चासत्रे/कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत.