स्वतंत्र भारतातील महाराष्ट्राच्या ज्ञानविज्ञानाच्या क्षेत्रातील आधुनिक गरजा आधीच हेरुन महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय श्री. यशवंतराव चव्हाण यांनी दिनांक 1 मे, 1960 ला महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या वेळी शासनाची जी धोरणविषयक प्रमेये जाहीर केली त्यात महाराष्ट्र राज्याच्या मराठी साहित्य, कला व संस्कृती या क्षेत्रातील कार्यकर्त्याच्या कार्यांची उपेक्षा होणार नाही; एवढेच नव्हे तर त्या कार्याची प्रगती व विकास होईल ह्या दृष्टीने पावले निश्चितपणे टाकण्यात येतील; असे आश्वासन दिले होते.

त्याच धोरणानुसार महाराष्ट्राचे साहित्य,इतिहास व संस्कृती यांच्या विकासासाठी दिनांक 19 नोव्हेंबर, 1960 ला शासनाने साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना  केली. त्यानंतर वेळोवेळी मंडळाची पुनर्रचना करण्यात आली. थोर विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मंडळाचे अध्यक्षपद भूषविले होते. त्यानंतर वेळोवेळी अनेक मान्यवर साहित्यिक व विचारवंतांची नियुक्ती या पदावर झाली.

मंडळाचे अध्यक्ष खालील प्रमाणे –

अध्यक्ष कार्यकाल
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी 1960 ते 1980
डॉ.सुरेंद्र बारलिंगे 1980 ते 1989
प्रा. यशवंत मनोहर 1989 ते 1990
डॉ. य.दि. फडके 1990 ते 1995
श्री. विद्याधर गोखले 1995 ते 1996
डॉ. मधुकर आष्टीकर 1996 ते 1998
श्री. द.मा. मिरासदार 1998 ते 1999
श्री. सुरेश द्वादशीवार 2000 ते 2000
प्रा. रा.रं. बोराडे 2000 ते 2004
प्रा. रतनलाल सोनग्रा 2004 ते 2004
पद्मश्री मधु मंगेश कर्णिक 2006 ते 16 ऑगस्ट 2013
मा. सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई तथा.

मा. अध्यक्ष, (अतिरिक्त कार्यभार), महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

17/08/2013 ते 04/08/2015
श्री. बाबा भांड 05 ऑगस्ट, 2015 ते दिनांक 25 डिसेंबर, 2018
डॉ. सदानंद मोरे 26 डिसेंबर, 2018 पासून