पिवळसर, तांबूस गोरा वर्ण, धरधरीत नाक, चमकदार, बारीक बोलके डोळे, लोभस वागणं, लाघवी बोलणं, मनमिळावू, मोकळा स्वभाव आदि अंगच्या गुणांनी विनायक-तात्या सर्वाचा लाडका, तसाच कौतुकाचा. शेतीवरील गडीमाणसं त्याच्या बालीश औदार्यानं मोठी भारावून त्याला ‘छोटे जहागीरदार’ म्हणून मोठ्या कौतूकाने मान देत असत.

अभिप्राय द्या!