तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी (जानेवारी २७, १९०१ – मे २७, १९९४) हे मराठी लेखक, कोशकार व सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक-संशोधक होते. जोशींचा जन्म धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे आणि शिक्षण वाई येथील प्राज्ञ पाठशाळेत झाले. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता. त्याकरिता इ.स. १९३२ साली त्यांना तुरुंगात जावे लागले.

संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते हिंदू धर्माचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत इत्यादी शास्त्रांवर ते अधिकारवाणीने बोलू शकत. हिंदू तत्त्वज्ञान त्यांनी चांगल्या प्रकारे अवगत केले होते.

  • धर्मकोशाचे 11 कांडापैकी पाच कांडांचे संपादन
  • विश्वकोशाच्या 40 खंडांपैकी 21 खंडांचे संपादन
  • ‘पद्मभूषण’ व ‘पद्मविभूषण’ हे किताब
  • 1954 साली दिल्ली येथे महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

सहित्य : शुध्दिसर्वस्वम् (1934), आनंदमीमांसा (1938), हिंदुधर्माची समीक्षा (1941), जडवाद (1941), वैदिक संस्‍कृतीचा इतिहास (1951), आधुनिक मराठी साहित्याची समीक्षा व रससिद्धांत (1953) राजवाडे लेखसंग्रह (1958) व लोकमान्य टिळक लेखसंग्रह

अभिप्राय द्या!