१९ व्या शतकामध्ये भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे सामाजिक परिवर्तन घडून आल्याचे दिसते. इंग्रजांचा व ख्रिस्ती धर्माचा- प्रभाव, पाश्चिमात्य शिक्षणामुळे विचारांना मिळालेल्या नव्या दिशा, यामुळे अनेक परिवर्तनशील व्यक्तिमत्त्वांना हिंदू धर्म व चातुवर्ण्यावर आधारलेली समाज रचना याबद्दल पुनर्विचार करावासा वाटू लागला व त्याप्रमाणे त्याची पावले पडू लागली हे बौद्धिक स्थित्यंतर उच्चवर्णियांपासून तत्कालीन अस्पृश्य वर्गापर्यंत पोहोचले व त्याचा प्रत्यक्ष परिणाम म्हणजे हिंदू धर्मातून विशेष करून ख्रिस्ती धर्माकडे ओढ घेण्याची प्रवृत्ती वाढू लागली.

अभिप्राय द्या!