यशवंतरावांचा जन्म १२ मार्च, १९१३ रोजी खानापूर तालुक्यातील सागरोबाच्या सान्निध्यातील देवराष्ट्रे या त्यांच्या आजोळी झाला. तेथील कै. दाजी घाडगे हे त्यांचे मामा.
देवराष्ट्रे गांव तिन्ही बाजूंनी सह्याद्री पर्वताच्या कडेकपारांनी वेढलेले आहे. सह्याद्री पर्वताचे सौंदर्य खरोखरच अवर्णनीय आहे. महाराष्ट्राच्या भूमीची व त्याचील माणासंची जडणघडणही सह्याद्रीच्या या वज्रासमान कडेकपारीनीच झालेली असावी, असे महाराष्ट्राचा इतिहास पाहिल्यावर वाटते. निसर्गसौंदर्याने नटलेल्या सह्याद्री पर्वताच्या कुशीतील देवराष्ट्रे गावी यशवंतराव जन्मले व लहानाचे मोठे झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षणही तिथेच झाले.