
आपल्या अलौकिक वक्तृत्वाने बॅ. नाथ पै यांनी राजापूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांची मने जिंकली आणि ते लोकसभेवर निवडून आले आणि एक झाकले माणिक उजेडात आले. उत्कृष्ट संसदपटू आणि आंतराराष्ट्रीय कीर्तीचा समाजवादी नेता असात अलौकिक सन्मान संपादन केलेल्या कोकणच्या या सुपुत्राचा जन्म २५ सप्टेंबर १९२२ रोजी वेंगुर्ले येथे झाला.