महाराष्‍ट्रातील ज्‍येष्‍ठ साहित्यिक व कलावंताचा सन्‍मान करण्‍याच्‍या दृष्‍टीने मंडळातर्फे दरवर्षी दोन मान्‍यवरांना गौरववृत्‍ती प्रदान करण्‍यात येते. रु. ५०,०००/- रोख, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या गौरववृत्‍तीचे स्‍वरुप असते.

यातील एक गौरववृत्‍ती ज्‍येष्‍ठ सा‍हित्यिकास तर दुसरी साहित्यिकेतर कलावंतास देण्‍याचे मंडळाचे धोरण आहे. ‘सन २०१२-२०१३ या वर्षातील गौरववृत्ती ज्येष्ठ समीक्षक डॉ.सुधीर रसाळ, औरंगाबाद यांना व ज्येष्ठ कलावंत श्री. वसंत अवसरीकर यांना देण्यात आली.

साहित्य निर्मितीमध्ये मोलाचे कार्य करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिकास देण्यात येणारा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार व मंडळाकडून गौरववृत्ती योजनेअंतर्गत कला व साहित्यातील ज्येष्ठ व्यक्तींना देण्यात येणारी गौरववृत्ती या दोन्ही योजना एकाच स्वरूपाच्या असल्यामुळे गौरववृत्ती योजना पुरस-1012/प्र.क्र.111/2012/भाषा-3, दिनांक 03 मार्च, 2014 अन्वये बंद करण्यात आली आहे.

अ.क्र. वर्षे साहित्यिक/कलावंत
१)१९८१-१९८२ श्री.माधवराव बागल, कोल्‍हापूर
श्री.नारायण सुर्वे, मुंबई
२)१९८२-१९८३श्री. बाबुराव बागुल, नाशिक
डॉ.रा.चिं.ढेरे, पुणे
३)१९८३-१९८४डॉ.वि.भि.कोलते, नागपूर
डॉ.सरोजिनी बाबर, पुणे
४)१९८४-१९८५श्री.पु.य.देशपांडे, बुलढाणा
श्रीमती आनंदीबाई शिर्के
५)१९८६-१९८७
१९८७-१९८८
श्री.ना.घ.देशपांडे, बुलढाणा 
पं.महादेवशास्‍त्री जोशी, पुणे
६)१९८८-१९८९श्री.वि.वा.शिरवाडकर, नाशिक
श्री.सेतु माधवराव पगडी, मुंबई
७)१९८९-१९९०श्री.रा.ना.चव्‍हाण, वाई
श्री.वा.रा.कांत, मुंबई
८)१९९०-१९९१श्री.उत्तमराव मोहिते,अमरावती
श्री.वामन कर्डक, नाशिक
९)१९९१-१९९२श्री.यदुनाथ थत्ते, पुणे
आचार्य दीनबंधू शेगावकर,अकोला
१०)१९९२-१९९३श्री.देवीसिंग चौहान, लातूर
शाहीर विश्‍वासराव फाटे
११)१९९३-१९९४श्री.प्रभाकर ऊर्फ भाऊ पाध्‍ये,वसई
शाहीर आत्‍माराम पाटील, मुंबई
१२)१९९४-१९९५श्रीमती वसुंधरा पटवर्धन, पुणे
श्री.राम नगरकर, पुणे
१३)१९९५-१९९६श्री.वि.श्री.जोशी, मुंबई
श्री.स.मा.गर्गे, पुणे
१४)१९९६-१९९७डॉ.भा.पं.बहिरट, पंढरपूर
श्रीमती इंदिरा संत, बेळगाव
डॉ.श्री.रं.कुलकर्णी, हैदराबाद
श्री.ज.शं.वाटाणे, नवी दिल्‍ली
१५)१९९७-१९९८श्रीमती मालतीबाई बेडेकर,पुणे
डॉ.म.न.जोशी, पुणे
१६)१९९८-१९९९श्री.गोपीनाथ तळवळकर, पुणे 
म.म.यज्ञेश्‍वरशास्‍त्री कस्‍तुरे,नांदेड
१७)१९९९-२०००डॉ.यू.म.पठाण, औरंगाबाद
श्रीमती नलिनी पंडित, मुंबई
१८)२०००-२००१श्री.शंकरराव खरात, पुणे
श्री.शिवाजी सावंत, पुणे
१९)२००१-२००२श्रीमती शांता शेळके, पुणे पद्मश्री
श्री.शंकर बापू आपेगांवकर, औरंगाबाद
२०)२००२-२००३शाहीर साबळे, मुंबई
डॉ.गंगाधर पानतावणे, औरंगाबाद
२१)२००३-२००४श्री.पुरुषोत्तम पाटील, धुळे
डॉ.गुलाम रसूल, परभणी
२२)२००४-२००५श्री.रामचंद्र गोपाळ शेलार, पुणे(ह.भ.प.शेलारमामा)
श्री.माणिक गोडघाटे, नागपूर(कवी ग्रेस)
२३)२००५-२००६मंडळाची पुनर्रचना झाली नसल्‍यामुळे त्‍यावर्षी गौरववृत्ती देण्‍यात आली नाही.
२४)२००६-२००७१) श्री.विठ्ठल उमप
२) डॉ.म.सु. पाटील
२५)२००७-२००८१) श्री.वि.पां.देऊळगावकर, गुलबर्गा
२) गुरु पार्वतीकुमार, मुंबई
२६)२००८-२००९१) डॉ.स.रा.गाडगीळ, औरंगाबाद
२) ज्‍येष्‍ठ शाहीरा सौ.अनुसयाबाई शिंदे, कळमनुरी
२७)२००९-२०१०१) प्रा.म.द.हातकणंगलेकर, सांगली
२) श्रीमती यमुनाबाई वाईकर, वाई
२८)२०१०-२०१११) श्री. भालचंद्र नेमाडे,  मुंबई २) श्री. लीलाधर हेगडे
२९)२०११-२०१२१) श्री. वसंत पळशीकर, नाशिक
२) श्री नवलादेवी नमन मंडळ, रत्नागिरी
३०)२०१२-२०१३१) डॉ. सुधीर रसाळ, औरंगाबाद  
२) श्री. वसंत अवसरीकर, पुणे

अभिप्राय द्या!