
१९७६ सालातला मे महिना. रत्नागिरीहून सकाळी निघालेली एस्.टी. ची बस अर्ध्या तासात गोळप या लहानशा गावी पोहोचली. तेथे एक उंच, शिडशिडीत बांध्याचे वृद्ध गृहस्थ आपल्या तीन नातवंडांना आणि सुनेला घेऊन उतरले. झपाट्याने चालत त्यांच्या जुन्या घरी पोहोचल्यावर उत्साहाने नातवाला म्हणाले, ‘निक्या, हे आपलं घर. इथं माझं लहानपण गेले.