महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून नवलेखक प्रोत्साहन अनुदान योजना राबविण्यात येते. सदर योजनेअंतर्गत ज्याचे आजमितीपर्यन्त एकही पुस्तक प्रकाशित झालेली नाही अशा नवलेखकांना कथा, कादंबरी, ललितगद्य, काव्य, नाटक (एकांकिका), बालवाङ्मय या  लेखनाच्या प्रकाशनासाठी मंडळाकडून अनुदान दिले जाते. सदर योजनेअंतर्गत ज्यांचे एकही पुस्तक प्रकाशित झाले नाही  अशा नवलेखकांकडून सन 2020 या वर्षासाठी  अर्ज मागविण्यात येत आहेत.

नवलेखक प्रोत्साहन अनुदान योजना माहितीपत्रक व अर्ज

अभिप्राय द्या!