मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष 2022 करिता राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांसाठीच्या प्रवेशिका पूर्वीच्या जाहिरातीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयात (मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून), तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दिनांक 1 जानेवारी, 2023 ते 31 जानेवारी 2023 पर्यंत पाठविता येणार होत्या. तथापि, सदर पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका व पुस्तके सादर करण्याच्या कालावधीस एक महिना अधिकची मुदतवाढ देण्यात येत असून आता सदर पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका व पुस्तके स्विकारण्याचा अंतिम दिनांक 2 मार्च, 2023 हा राहील.  सन 2022 पुरस्कार स्पर्धेची  नियमपुस्तिका व प्रवेशिका पाहण्यासाठी इथे क्लिक करा

अभिप्राय द्या!